-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. येणाऱ्या नवीन वर्षातही गुरूचे राशी, नक्षत्र परिवर्तन होईल शिवाय या काळात गुरू वक्री, अस्त आणि मार्गी होईल ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर विशेष प्रभाव देईल. -
पंचांगानुसार, गुरू ११ नोव्हेंबर २०२५ कर्क राशीत वक्री झाला असून सध्या गुरू याच स्थितीत आहे. ११ मार्च २०२६ रोजी गुरू मार्गी होईल. गुरू मार्गी होण्यासाठी आता काही दिवस उरले असून गुरूची ही मार्गी स्थिती १२ पैकी काही राशींवर विशेष प्रभाव टाकेल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची मार्गी अवस्था खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल.
-
गुरू ग्रहाची मार्गी स्थिती वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.
-
गुरू ग्रहाच्या मार्गी स्थितीचा धनु राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूची मार्गी अवस्था लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम आणि AI)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…