-
आपले शरीर ६० ते ७० टक्के पाण्याने बनलेले असते. वय, लिंग किंवा शरीराच्या प्रकारानुसार याचे प्रमाण कदाचित थोडेसे बदलत असले तरीही पाणी प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. अगदी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यापासून ते पेशींमध्ये पोषक तत्वे, ऑक्सिजन पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत पाणी महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदू, फुफ्फुसे, स्नायू यांसारख्या अवयवांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे हे अवयव शरीरासाठी किती महत्त्वाचे आहेत याबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाणी तुमच्या शरीरातील अशुद्धता बाहेर काढण्यास देखील मदत करतो. म्हणून, शरीर डिहायड्रेटेड राहणार नाही याची खात्री तुम्ही केलीच पाहिजे. त्यासाठी अनेक जण याची तयारी सकाळपासूनच करायला सांगतात. म्हणजे दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने करायला सांगतात. पण, अनेकांना एक प्रश्न पडतो: सकाळी उठल्यानंतर नेमकं किती पाणी प्यावे? सकाळी पाणी पिण्याचे फायदे काय ? जास्त पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असू शकते का?(फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉक्टर संजीव सक्सेना यांच्याकडून जाणून घेऊयात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
सकाळी जास्त पाणी पिण्याचे काय तोटे आहेत?
डॉक्टरांच्या मते एकाच वेळी जास्त पाणी पिणे शरीरासाठी चांगले नाही. यामुळे तुमच्या मूत्रपिंडांवर दबाव येऊ शकतो. सकाळी १ लिटरपेक्षा जास्त पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.(फोटो सौजन्य: @Freepik) -
रिकाम्या पोटी किती पाणी प्यावे?
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात १ ते २ ग्लास कोमट पाणी पिऊन करावी. असे करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. एकाच वेळी जास्त पाणी कधीही पिऊ नका. एका वेळी १ लिटर किंवा त्याहून अधिक पाणी पिणे टाळा. जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर जास्त पाणी पिणे वेळीच टाळा.(फोटो सौजन्य: @Freepik) -
पाणी पिण्याची योग्य पद्धत
पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे तुमचे दररोजचे ३ लिटर पाणी अनेक भागांमध्ये विभागून प्यायलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर, अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्या. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या. दिवसभर अधूनमधून पाणी असं काहीसे तुमचे पाणी पिण्याचे विभाजन असले पाहिजे.(फोटो सौजन्य: @Freepik) -
रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे
सकाळी उठल्यावर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाण्याचे सेवन केल्याने
तुमची पचनसंस्था सक्रिय होते.
तुमचे चयापचय वाढते.(फोटो सौजन्य: @Freepik) -
डिहायड्रेशन टाळता येते.शरीराचे तापमान संतुलित राहते.
विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…