-
गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील काळ मानला जातो. या काळात शरीरात अनेक शारीरिक व भावनिक बदल घडत असतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आई आणि गर्भातील बाळाच्या योग्य वाढीसाठी संतुलित व पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आहारतज्ज्ञांच्या मते, काही फळे सामान्य वेळी अमृतमयी गुणधर्माची ठरत असली तरी गरोदरपणात ती ‘जोखमीची’ ठरू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
अननस
अननसमध्ये ‘ब्रोमेलिन’ नावाचे एंझाइम जास्त प्रमाणात असते. ते गर्भाशयमुख मऊ करण्यास कारणीभूत ठरून, आकुंचन वाढवू शकते. त्यामुळे अकाली प्रसूतीचा धोका संभवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
द्राक्षे
द्राक्षे पौष्टिक असली तरी त्यांच्या सालीमध्ये ‘रेसव्हेराट्रॉल’ नावाचे संयुग आढळते. हे संयुग गर्भवतींसाठी अपायकारक ठरू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कलिंगड
कलिंगड शरीराला पाणीपुरवठा करते आणि विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. पण, गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या महिलांमध्ये रक्तातील साखर वाढण्याची शक्यतादेखील असते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पपई
पपईत लेटेक्ससदृश घटक असतात, जे गर्भाशयात आकुंचन अवस्था निर्माण करू शकतात. त्यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पीच (Peach)
पीच (Peach) हे उष्ण प्रकृतीचे फळ मानले जाते. त्यामुळे त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरात उष्णता वाढून अंतर्गत रक्तस्राव किंवा गर्भपाताचा धोका संभवतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
गर्भधारणेदरम्यान कोणतेही अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…