-
बदलत्या हवामानात शरीराला थंडावा देत पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी नैसर्गिक अन्नपदार्थांचे महत्त्व वाढले आहे. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करून ताजेपणा देणारी कोहळा-डाळिंब कोशिंबीर आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कोशिंबीर कशी तयार करावी?
साहित्य: कोहळ्याचा एक तुकडा, एक लहान डाळिंब, दोन चमचे दही, चवीनुसार मीठ व मिरीपूड. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कोहळ्याच्या बिया व पांढरा गर काढून टाका. नंतर त्या कोहळ्याचे तुकडे करून किसून, त्यातील पाणी पिळून काढा. डाळिंबाचे दाणे वेगळे करा. एका भांड्यात किसलेला कोहळा, डाळिंबाचे दाणे, मीठ व मिरीपूड घालून चांगले मिसळा. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी ही पौष्टिक कोशिंबीर तयार होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
शरीराला थंडाव्याचा लाभ
कोहळ्यात सुमारे ९६ टक्के पाणी असते. त्यामुळे उष्ण हवामानात शरीरातील पाण्याची कमतरता टाळून नैसर्गिक थंडावा मिळतो. मात्र, सर्दी, दमा किंवा सायनसचा त्रास असलेल्या व्यक्तींनी त्याचे मिरी किंवा मधासह सेवन करणे योग्य ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ऊर्जा वाढण्यास मदत
कोहळ्यातील जीवनसत्त्व ‘ब३’ अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे थकवा कमी होऊन, शरीरात स्फूर्ती वाढते आणि मज्जासंस्था शांत राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मेंदूची कार्यक्षमता सुधारते
दररोज कोहळ्याचे सेवन केल्यास बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते, असे सांगितले जाते. त्यात असलेले फोलेट मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरते आणि तणाव कमी करण्यास साह्यभूत ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कोहळ्याचे पौष्टिक गुणधर्म
कोहळ्यात ‘ब’ व ‘क’ या जीवनसत्त्वांचा समूह असतो. त्यामध्ये नायसिन, थायमिन व रायबोफ्लेविन हे घटक मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील चयापचय प्रक्रिया आणि ऊर्जानिर्मितीसाठी मदत करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
डाळिंबाचे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध फायदे
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार डाळिंब उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, दाह व रक्तातील साखर यांसारख्या धोक्याच्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…