-
उन्हाळ्यात सर्वाधिक आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. सुमारे ९२ टक्के पाण्याचे प्रमाण असलेले हे फळ शरीराला थंडावा देण्यास आणि पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये कलिंगड खाण्याबाबत नेहमीच संभ्रम निर्माण होतो. कलिंगड गोड असल्यामुळे ते रक्तातील साखरेवर परिणाम करेल का, असा प्रश्न अनेकांना पडतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तज्ज्ञांच्या मते, कलिंगडाचा साखर निर्देशांक तुलनेने जास्त असला तरी त्याचा साखरभार अत्यंत कमी असतो. त्यामुळे योग्य प्रमाणात कलिंगड खाल्ल्यास मधुमेहींना त्याचा त्रास होत नाही. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दिवसाला साधारण दीडशे ग्रॅम म्हणजेच एक वाटी चिरलेले कलिंगड सुरक्षित मानले जाते. मात्र, ते जेवणासोबत किंवा जेवणाच्या आधी-नंतर त्वरित खाणे टाळावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सकाळी मधल्या वेळेत किंवा सायंकाळी अल्पोपाहार म्हणून कलिंगड खाणे अधिक योग्य ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
कलिंगडामध्ये जीवनसत्त्व क, अ व ब६ यांसारखी जीवनसत्त्वे, तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट व कॅल्शियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
त्याशिवाय कमी साखर निर्देशांक असलेली इतर काही फळेही मधुमेहींसाठी सुरक्षित मानली जातात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
जांभूळ, सफरचंद, नाशपाती, संत्रे, मोसंबी, पपई, स्ट्रॉबेरी, चेरी, आलुबुखार व किवी यांसारखी फळे मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…