-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे.
-
एप्रिल महिन्यात बुध दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. ज्यात सर्वात आधी तो ११ एप्रिल २०२६ रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करेल आणि २० एप्रिल २०२६ रोजी मेष राशी गोचर करेल.
-
बुधाच्या एकाच महिन्यातील दोन वेळा होणाऱ्या राशी परिवर्तनाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या व्यक्तींना धन-संपत्ती, नोकरी, मान-सन्मान प्राप्त होईल.
-
बुधाचे एप्रिल महिन्यात होणारे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल.
-
कर्क राशीच्या व्यक्तींना बुध ग्रहाचे दोन वेळा होणार गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल.
-
बुधाचे गोचर कन्या राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल.
-
बुध ग्रहाचे दोन वेळा होणारे राशी परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…