-
विमान उड्डाणांना उशीर झाल्यास सर्वांचाच हिरमोड होतो. पण या वेळेचाही तुम्ही सदुपयोग करू शकता. एका तासापासून ते पूर्ण दुपारपर्यंत, आजची विमानतळे उत्पादक राहण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी भरपूर संधी देतात.
-
विमानतळ एक्सप्लोर करा: चांगी विमानतळ आणि हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ सारख्या अनेक प्रमुख केंद्रांमध्ये बागा, कला प्रतिष्ठाने, लाउंज आणि अगदी सिनेमागृहे आहेत. त्यामुळे तुमच्या विमानाला उशीर होणार असेल तर तुम्ही विमानतळ हे एखाद्या पर्यटन क्षेत्रासारखं फिरू शकता.
-
स्थानिक पदार्थ खा : विमानतळावर फास्ट फूड खाण्याऐवजी, तेथील प्रादेशिक पदार्थांचा आस्वाद घ्या. विमानतळांवर अनेकदा स्थानिक पदार्थही विकले जातात.
-
वेलनेस रुम : जास्त वेळ वाट पाहिल्याने थकवा जाणवू शकतो. टर्मिनलभोवती फिरा, हलके व्यायाम करा. काही विमानतळांवर प्रवाशांना रिचार्ज होण्यास मदत करण्यासाठी योगा रूम किंवा वेलनेस स्पेस देखील उपलब्ध असतात.
-
वाचन किंवा पॉडकास्ट ऐका: ई-पुस्तक डाउनलोड करा, तुम्ही पूर्ण करू इच्छित असलेली कादंबरी पुन्हा वाचा किंवा प्रवास पॉडकास्ट एक्सप्लोर करा. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स व्यस्त टर्मिनलला तुमच्या वैयक्तिक वाचन कोपऱ्यात बदलू शकतात.
-
विश्रांती ध्या – जर विलंब बराच असेल, तर विमानतळावरील लाउंज किंवा अल्पकालीन हॉटेल रूम बुक करण्याचा विचार करा. बोर्डिंग करण्यापूर्वी आंघोळ किंवा एक छोटीशी डुलकी तुमचा मूड पूर्णपणे बदलू शकते.
-
तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी वेळेचा वापर करा: तु्म्हाला जिथे जायचं आहे त्याबाबत नियोजन करा. जिथे जाणार आहात तेथील हॉटेल्सवगैरे मोबाईलवर शोधा. तिथे काय काय बघता येईल याचं प्लानिंग करा. (सर्व फोटो – इंडियन एक्स्प्रेस)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…