-
उन्हाळ्यात हळदीचा आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
विशेषतः उष्ण हवामान, घामामुळे होणारी शरीरातील पाण्याची कमतरता आणि ऋतुबदलामुळे निर्माण होणाऱ्या त्रासांपासून शरीराचे संरक्षण करण्यास हळद उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दाहकता कमी करण्यास मदत
हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचा नियमित वापर केल्यास शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
हळद शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. हळद शरीरातील हानिकारक सूक्ष्मजीवांशी लढण्याची क्षमता वाढवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त
उन्हाळ्यात अनेकांना आम्लपित्त, पोट फुगणे किंवा भूक न लागणे अशा तक्रारी जाणवतात. हळद पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शरीर शुद्ध ठेवण्यास मदत
हळद यकृताच्या कार्यास साह्य करून शरीरातील अपायकारक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
त्वचेचे आरोग्य जपण्यास फायदेशीर
हळदीमध्ये त्वचेचे संरक्षण करणारे आणि जीवाणूंचा नाश करणारे गुणधर्म असतात. आहारात हळद घेतल्यास त्वचा चांगली राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
कसे आणि किती प्रमाण?
हळद दुधात मिसळून प्यावी. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा कप हळदीचे दूध पुरेसे आहे. जास्त अतिरेक केल्यास वाईट परिणाम उदभवू शक्तात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?