-
Zee Chitra Gaurav 2026: मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजेच ‘झी चित्रगौरव पुरस्कार २०२६’.
-
यंदा हा सोहळा “मराठी गाजलंच पाहिजे!” हा ठाम नारा देत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा अभिमान, परंपरेचा ठसा आणि आधुनिकतेची अनोखी झलक पाहायला मिळणार आहे.
-
यंदाचा सोहळा भव्य रेड कार्पेटने अधिकच दिमाखदार झाला.
-
मराठी सिनेसृष्टीतील नामांकित कलाकारांनी आपल्या मराठमोळ्या वेशभूषेत रेड कार्पेटवर हजेरी लावली.
-
यावेळी प्रत्येकाच्या ओठांवर एकच संदेश होता – “मराठी गाजलंच पाहिजे!”.
-
या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, अंकुश चौधरी, गौतमी देशपांडे, समीर चौघुले, रोहन मापुस्कर, शिवराज वायचळ, साजिरी जोशी, ऋजुता देशमुख, पर्ण पेठे, पुष्कराज चिरपुटकर, रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, प्रिया बेर्डे, अमृता सुभाष, भारत जाधव, अमृता खानविलकर, ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.
-
विशेष आकर्षण ठरलं ते कलाकारांचे ‘इंडो-वेस्टर्न’ लुक्स!
-
काही कलाकारांनी पारंपरिक नऊवारी आणि कुडत्याला आधुनिकतेची जोड देत एक नवा ट्रेंड सेट केला.
-
पारंपरिक दागिन्यांना ‘मिनिमलिस्टिक स्टाईल’मध्ये मिरवत त्यांनी ‘क्लासिक विथ अ ट्विस्ट असे फॅशन स्टेटमेंट सादर केले.
-
केवळ फॅशनच नव्हे, तर आपल्या मातीशी असलेलं नातं आणि संस्कृतीबद्दलचा सार्थ अभिमान यावेळी कलाकारांच्या स्टाईलमधून दिसून आला.
-
झी चित्रगौरव २०२६चा हा रेड कार्पेट सोहळा येत्या १४ मार्चला, संध्याकाळी ७:०० वाजता झी मराठीवर पाहता येईल.
-
(सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
“७ वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुण्यात आलेल्यांनी आम्हाला गणेशोत्सव शिकवू नये”, विद्यानंद बापटांवर रुपाली ठोंबरे पाटील यांची टीका