-
एनर्जी ड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक आणि हर्बल पेय म्हणून नारळाचे पाणी जास्त आरोग्यदायी असते. ताज्या नारळाच्या पाण्यात कोणतीही भेसळ नसते, त्यामुळे त्याला आरोग्यदायी मानले जाते. पोट आणि आतड्यांसंबंधी समस्यांसाठी, नारळ पाणी खूप चांगले काम करते. दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस कमी करता येतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आयुर्वेदाच्या संचालक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टर चंचल शर्मा यांच्या मते, नारळ पाणी पिल्याने पचनसंस्था मजबूत होते, पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो, आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी एक नारळ पाणी एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. त्यात अनेक एन्झाइम असतात जे, आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात आणि पचनसंस्था मजबूत ठेवतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाच्या पाण्यात काय असते?
नारळाच्या पाण्यात अनेक आरोग्यदायी पोषक घटक असतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण चांगले असते. जर तुम्हाला डिहायड्रेशन होत असेल तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता.आरोग्यदायी मानले जाते. पोट आणि आतड्यांसंबंधी समस्यांसाठी, नारळ पाणी खूप चांगले काम करते. दररोज नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस कमी करता येतो. (फोटो सौजन्य: @Freepik) -
नारळ पाणी पिण्याचे फायदे
हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांनी नारळ पाणी सेवन करावे.
नारळ पाण्यात पोटॅशियम नावाचे खनिज असते, जे रक्तदाब नियंत्रित करते.
केस आणि त्वचेसाठी देखील चांगले आहे.
(फोटो सौजन्य: @Freepik) -
यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा स्वच्छ होते.
ज्या लोकांना त्वचेवर मुरुमांची समस्या आहे, त्यांना सेवन केल्याने खूप फायदा होतो.(फोटो सौजन्य: @Freepik) -
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यावे. यामुळे तुमचे चयापचय वाढण्यास मदत होते. जे नियमितपणे व्यायाम करतात, ज्यांना भरपूर ऊर्जा हवी असेल तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.(फोटो सौजन्य: @Freepik) -
दिवसातून किती नारळ पाणी प्यावे?
जर तुम्हाला कोणत्याही गंभीर आरोग्य समस्या नसतील, तर तुम्ही दररोज एक ते दोन ग्लास नारळ पाणी किंवा ४०० मिली पर्यंत पिऊ शकता. जर तुम्हाला मधुमेह असेल, तर नारळ पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik) -
नारळ पाणी कसे प्यावे?
नारळ पाणी पिण्यापूर्वी ताजे आहे का याची खात्री करा. बऱ्याचदा, ताजे नारळ पाणी उपलब्ध नसल्यामुळे, लोक प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि पॅके केलेले नारळ पाण्याचे सेवन करतात. त्यापेक्षा नेहमी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले नारळ पाणी प्या.(फोटो सौजन्य: @Freepik)
Viral Dance Video: ‘इश्क तेरा तडपावे..’ गाण्यावर हार्दिक- इशानचा भन्नाट डान्स! अदिती हुंडिया अन् महिका शर्माच्या डान्सने वेधलं लक्ष, पाहा Video