-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. निमित्त आहे त्याचा सख्खा भाऊ अल्लू सिरीश (Allu Sirish) याचा विवाह सोहळा.
-
सिरीशने नुकतीच नयनिका रेड्डीबरोबर (Nayanika Reddy) लग्नगाठ बांधली असून, या शाही सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत.
-
अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीने (Sneha Reddy) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून या लग्नसोहळ्यातील काही क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या खास लग्नसोहळ्यासाठी स्नेहा रेड्डीने पेस्टल निळ्या रंगाची अत्यंत सुंदर सिल्क साडी नेसली होती.
-
या लूकवर स्नेहा रेड्डीने हिऱ्यांच्या दागिन्यांचा साज केला होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
दुसरीकडे, ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने पारंपरिक दाक्षिणात्य पेहराव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
स्नेहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अल्लू अर्जुन, त्यांची मुले अयान आणि अरहा यांच्यासह संपूर्ण कुटुंब आनंदी वातावरणात दिसत आहे.
-
अल्लू अर्जुन आणि स्नेहा ६ मार्च २०११ रोजी विवाहबंधनात अडकले होते.
-
आज त्यांच्या जोडीची गणना टॉलिवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हणून केली जाते.
-
केवळ टॉलिवूडच नाही, तर संपूर्ण देशभरात अल्लू अर्जुनची प्रचंड क्रेझ आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अल्लू अर्जुन/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा