-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) सध्या तिच्या ‘तिघी’ (Tighee Movie) या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
या चित्रपटात नेहाबरोबरच दिग्गज अभिनेत्री भारती आचरेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
-
दिग्दर्शिका जीजिविषा काळे यांनी या चित्रपटातून आई आणि तिच्या दोन मुलींची हृदयस्पर्शी गोष्ट मांडली आहे.
-
नात्यांमधील संवादाचा अभाव, स्त्रियांचा मूक संघर्ष आणि घराभोवती गुंफलेल्या त्यांच्या भावना याचे प्रभावी दर्शन या कथेतून घडते.
-
पुण्यामध्ये या चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा पार पडला होता.
-
या खास प्रसंगी नेहा पेंडसेच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
नेहाने या प्रीमियरसाठी काळ्या रंगाची सुंदर बनारसी साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
दिवसातून एकदाच जेवल्याने वजन कमी होते की उलट वाढते? आहारतज्ज्ञ काय सांगतात?