-
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) सध्या आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
-
सध्या नम्रता ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun Marathi Natak) या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे.
-
प्रसाद खांडेकर लिखित आणि दिग्दर्शित या नाटकाचे अमेरिकेत (USA) ठिकठिकाणी प्रयोग होत आहेत.
-
या व्यग्र दौऱ्यातून वेळ काढत नम्रताने कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध ‘डिस्नेलँड’ला (Disneyland) भेट दिली.
-
जगप्रसिद्ध मनोरंजन पार्क असलेल्या डिस्नेलँडची स्थापना स्वतः वॉल्ट डिस्ने यांनी १९५५ मध्ये केली होती.
-
मिकी माऊसचे घर, ‘स्टार वॉर्स: गॅलेक्सीज एज’ आणि ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ यांसारख्या आकर्षणांमुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीस उतरते.
-
नम्रताने सोशल मीडियावर तिथले काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने ‘Overwhelmed’ (भारावून गेले) असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
सिग्नलवरील भिकाऱ्यांचे भयानक ‘सत्य’ उघड! ‘हा’ व्हायरल VIDEO पाहून पुन्हा भीक देण्याआधी १००० वेळा विचार कराल