-
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या त्यांच्या सिंगापूर ट्रीपमुळे चर्चेत आहेत.
-
प्रवासाची आवड असलेल्या या जोडीने सध्या सिंगापूरमधील (Singapore) प्रसिद्ध ‘डिस्ने ॲडव्हेंचर’ (Disney Cruise Adventure) या भव्य क्रूझवर भटकंती केली आहे.
-
या क्रूझवरील ‘डिस्ने इमॅजिनेशन गार्डन’ आणि ‘डिस्ने डिस्कव्हरी रीफ’ अशा सात वेगवेगळ्या थीम्स असलेल्या झोन्समध्ये त्यांनी मनसोक्त भटकंती केली.
-
यावेळी सिद्धार्थ आणि मितालीने रोमँटिक अंदाजात खास फोटोशूट केले आहे.
-
सिद्धार्थ आणि मितालीने ‘Disney Magic All Around’ असे कॅप्शन देत हे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
सिद्धार्थ आणि मितालीने आतापर्यंत लंडन, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड्ससह अनेक देशांची सफर केली आहे.
-
विशेष म्हणजे, मितालीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ते दोघेही आपल्या एकूण कमाईचा सुमारे २० ते ३० टक्के हिस्सा केवळ फिरण्यासाठी राखून ठेवतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
४० दिवसांनंतर छप्परफाड पैसा! गुरू उदयामुळे ‘या’ ४ राशींवर होणार पैशांचा वर्षाव, सुरू होतील अच्छे दिन…