-
कर्नाटकातल्या कुर्ग या ठिकाणी धुक्याच्या टेकड्या, कॉफीचे मळे, धबधबे अशी खूप ठिकाणं आहेत. समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं कुर्ग आहे. तुम्ही या ठिकाणांना भेट दिली आहे का जाणून घ्या.
-
अॅबी फॉल्स हे ठिकाण पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. हिरवेगार कॉफी मळे, मसाल्यांची बाग हे इथली खासियत आहे. अॅबी फॉल्स या ठिकाणी सुंदर झरे आहेत.
-
दुबरे हत्ती कॅम्प हा कावेरी नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी हत्ती पाहण्यास मिळतात. शिवाय निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे खास ठिकाण आहे.
-
मंडलपट्टी हा भाग साहसी लोकांचं आवडतं ठिकाण आहे. रोज जीप राईड्स इथली खासियत आहे. धुक्याने झाकलेल्या पर्वतरांगा लोकांना खूप आवडतात.
-
नामड्रोलिंग मठ हे खूप सुंदर ठिकाण आहे. भव्य सोनेरी पुतळे, सुंदर चित्र आणि शांत वातावरण ही इथली खासियत आहे.आहे.
-
राजाज सीट नावाचं एक ठिकाण कूर्गला आहे. कूर्गचे राजे या ठिकाणी आराम करायला आले होते. त्यावेळी त्यांना हे ठिकाण आवडलं त्यामुळे राजाचं आसन किवा राजाचं सीट असं ठिकाणाला म्हटलं जातं.
-
तलकावेरी हे ठिकाणही सुंदर आहे. कावेरी नदीचा उगम या ठिकाणाहून होतो. या निसर्गरम्य ठिकाणी लोक कायमच येतात.
RR vs CSK: वैभव सूर्यवंशीने घडवला इतिहास, IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू