-
मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरु असल्याने जगभरात इंधन आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. (फोटो – ANI)
-
एलपीजी तुटवडा निर्माण झाल्याने सर्वत्र सिलिंडर मिळविण्यासाठी धावपळ सुरु असून, अनेक ठिकाणी नागरिक रांगा लावताना दिसत आहेत. (फोटो – Freepik)
-
एलपीजी गॅसचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता, गृहिणींना स्वयंपाकासाठी आधुनिक आणि शाश्वत पर्यायांचा विचार करता येऊ शकतो. (फोटो – Canva)
-
एकाच इंधनावर अवलंबून न राहता विविध पर्यायांची तयारी ठेवणे आजच्या काळात गरजेचे देखील झाले आहे. (फोटो – Canva)
-
इंडक्शन कुकटॉप- गॅस सिलिंडरला इंडक्शन कुकटॉप हा एक उत्तम पर्याय आहे. वीजेवर चालणारे हे उपकरण जलद आणि सुरक्षित आहे. (फोटो – Freepik)
-
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर – याचा वापर करून वरण-भात किंवा इतर पदार्थ कमी वेळेत शिजवता येतात. (फोटो – Canva)
-
सोलर कुकर – सूर्यप्रकाशाच्या मदतीने विनामूल्य आणि इंधनविरहित स्वयंपाक करण्यासाठी या पर्यावरण पूरक पर्यायाचा वापर केला जाऊ शकतो. (फोटो – Freepik)
-
बायोगॅस – घरच्या घरी इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असणारी ही पारंपरिक गॅस निर्मिती पद्धत आहे. (फोटो – pixabay)
-
मायक्रोवेव्ह ओव्हन आणि एअर फ्रायर – अन्न पुन्हा गरम करण्यासाठी याचा वापर केल्यास गॅसची मोठी बचत होऊ शकते. (फोटो – canva)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?