-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, पैसा, वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. बुध चंद्रानंतर जलद गतीने राशी परिवर्तन करणार ग्रह आहे, तो राशी परिवर्तनासह, नक्षत्र परिवर्तनही करतो शिवाय तो अस्त, मार्गी आणि वक्री देखील होतो.
-
ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ५२ मिनिटांनी बुधदेव शततारका नक्षत्राच्या चतुर्थ पदामध्ये प्रवेश करेल, बुधाचे हे गोचर नक्कीच काही राशींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. -
बुधाचे गोचर तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. -
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(फोटो सौजन्य: AI)
झी मराठीवरील ‘या’ नायिका आहेत सख्ख्या बहिणी, लोकप्रिय मालिकांत साकारतायत मुख्य भूमिका; तुम्ही ओळखलंत का?