-
झी मराठी वाहिनीवरील ‘शुभ श्रावणी’ (Shubh Shravani TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री वल्लरी विराज (Vallari Viraj) ही ‘श्रावणी’ची मुख्य भूमिका साकारत असून, आपल्या अभिनयाने तिने घराघरांत ओळख निर्माण केली आहे.
-
वल्लरी यंदा गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa 2026) डोंबिवलीच्या प्रसिद्ध शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’मधील आपल्या सहकलाकारांसह सहभागी होणार आहे.
-
याबद्दल बोलताना वल्लरी म्हणाली, प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची ही एक उत्तम संधी असते.
-
त्यांच्याबरोबर नवीन वर्ष साजरे करण्याचा अनुभव नेहमीच सुखद असतो.
-
शोभायात्रेतील लोकांचा उत्साह खरोखरच पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो.
-
या शोभायात्रेसाठी वल्लरी खास पारंपारिक वेशभूषेत दिसणार आहे.
-
घराबाहेर सेलिब्रेशन असले तरी, घरगुती परंपरेबद्दल ती सांगते, आमच्या घरीही तितक्याच उत्साहात गुढी उभारली जाते.
-
गुढीपाडव्याचा सण म्हणजे सहकुटुंब एकत्र येण्याचा आनंद.
-
त्यात भर म्हणून माझी आई दरवर्षी गुढीपाडव्याला खास बासुंदी-पुरीचा बेत करते, ज्याची मी आतुरतेने वाट पाहत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : वल्लरी विराज/इन्स्टाग्राम)
CJP मधून हकालपट्टी झाल्यावर विजेता दहियाची प्रतिक्रिया, “मी यापुढेही बर्गर खाणारच”, व्हायरल व्हिडीओचा वाद काय?