-
प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यात माणूस झोकून देऊन प्रेम करत असतो. रोमिओ ज्युलिएट, लैला मजनू यांच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. या प्रेमकथांचा शेवट चांगला झालेला नाही. पण इतिहासाच्या पानांमध्ये अशाही काही प्रेमकहाण्या आहेत ज्यांचा अंत वाईटच झाला आहे. तो सुखांत कधीच नव्हता. जाणून घेऊ अशाच काही कहाण्यांबाबत.(अनस्प्लॅश)
-
अबेलार्ड आणि हेलॉइस यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली. तत्वज्ञ पीटर अबेलार्डचं त्याच्या विद्यार्थिनीवर म्हणजेच हेलॉइसवर प्रेम जडलं. या प्रेमप्रकरणामुळे पॅरीस हादरलं होतं. मध्ययुगीन काळात ही संकल्पनाच पॅरीस मान्य झाली नाही. अबेलार्डला शिक्षा झाली. दोघांनाही वेगळ्या धार्मिक संस्थांमध्ये आयुष्य काढावं लागलं. (विकिमीडिया कॉमन्स)
-
क्लिओपात्रा आणि अँटोनी यांची प्रेमकहाणीही अधुरीच राहिली. पराभवानंतर अँटोनी खचला. त्यामुळे या उत्कट नात्याचा शेवट आत्महत्यांमध्ये झाला. कारण दोघांनाही जीव दिला. (विकिमीडिया कॉमन्स)
-
युवराज रुडॉल्फ आणि बॅरोनस मेरी वेटसेरा यांचा १८८९ मध्ये मायरलिंग या ठिकाणी रहस्यमय मृत्यू झाला. युरोपच्या इतिहासातली अस्वस्थ करणारी प्रेमकहाणी म्हणून याकडे पाहिलं जातं. (विकिमीडिया कॉमन्स)
-
पोर्तुगालचा पेद्रो पहिला आणि इनेस डी कॅस्ट्रो यांच्या प्रेमामुळे पोर्तुगीज दरबारात संताप झाला. ज्यानंतर इनेसला मृत्यूदंड ठोठावला गेला. पुढे पेद्रो सत्तेवर आला त्याने इनेसला राणी घोषित केलं आणि तिच्या मृत्यूनंतर आपण राज्याभिषेक केला असल्याचा दावा केला.(विकिमीडिया कॉमन्स)
-
मारिया दे पाडिला आणि कॅस्टिलचा पीटर यांचं लग्न झालं होतं. पण त्यामुळे दरबारात वाद निर्माण झाला. नात्याभोवती राजकीय वादळ निर्माण झालं. प्रेमकथेची शोकांतिका झाली.(विकिमीडिया कॉमन्स)
-
राजकुमार सलीम आणि अनारकली यांच्याबाबतही एक अख्याचिका सांगितली जाते. अनारकली गणिका होती. त्यामुळे सलीमच्या वडिलांनी म्हणजेच अकबराने तिला नाकारलं. सलीम आणि अनारकलीच्या प्रेमसंबंधांना तीव्र विरोध केला. काही कथांनुसार अनारकलीला भिंतीत चिणून मारण्यात आलं. आशियाई इतिहासातली ही सर्वात दुःखद प्रेमकथा मानली जाते. (विकिमीडिया कॉमन्स)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत