-
पोटफुगी कमी होते
बडीशेपमधील घटकांमुळे शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर पडते. त्यामुळे पोटाचा जडपणा कमी होऊन शरीर हलके वाटते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
दाह आणि उष्णता शांत होते
बडीशेप गुणधर्माने थंड असल्याने शरीरातील अंतर्गत उष्णता आणि पित्त कमी होते, ज्यामुळे अस्वस्थता थांबते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पचनक्रिया सुधारते
हे पाणी पाचक रसांना चालना देते. महिनाभरात गॅस, अपचन आणि जेवणानंतर होणारा त्रास पूर्णपणे कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
आतड्यांचे आरोग्य उत्तम
बडीशेपमुळे पोटातील चांगल्या जीवाणूंची वाढ होते. त्यामुळे अन्नातील पोषक तत्त्वे शोषण्याची शरीराची क्षमता वाढते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
स्त्री आरोग्यास लाभ
मासिक पाळीतील वेदना आणि कंबरदुखीवर बडीशेपचे पाणी गुणकारी आहे. त्यामुळे पाळीच्या काळातील पोटफुगीचा त्रास कमी होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
विषमुक्त शरीर आणि चयापचय
हे पाणी यकृताची कार्यक्षमता वाढवते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून चयापचय क्रिया अधिक वेगवान करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मुखशुद्धी आणि ताजेपणा
पोटाच्या तक्रारींमुळे येणारी तोंडाची दुर्गंधी थांबते. हे पाणी महिनाभर नियमित सेवन केल्याने श्वास दीर्घकाळ ताजेतवाना राहतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वजन नियंत्रण
बडीशेपचे पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित राहते. अनावश्यक खाणे टाळले गेल्याने वजन कमी करण्यास नैसर्गिक मदत मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
अग्रलेख: बाईबळीवर बोळवण?