-
उन्हाळ्याचा कडाका वाढला की आपण फक्त तहान शमवण्याचा विचार करतो. पण, आपल्या स्वयंपाकघरातील काही पारंपरिक पेये केवळ थंडावाच देत नाहीत, तर शरीरासाठी आवश्यक असलेले ‘प्रोटीन’ (प्रथिने) देखील पुरवतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
लस्सी (दह्याचे पेय)
दह्यापासून बनवलेली एक ग्लास (२०० मिली) लस्सी ६ ते ८ ग्रॅम प्रोटीन देते. उन्हाळ्यात दुपारी लस्सी प्यायल्याने पोट भरलेले राहते आणि स्नायूंना बळकटी मिळते. यात थोडे सुके मेवे घातल्यास त्याचे पौष्टिक मूल्य अधिक वाढते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
बदाम दूध
दूध आणि ८-१० भिजवलेले बदाम एकत्र करून बनवलेल्या पेयात ५ ते ७ ग्रॅम प्रोटीन असते. हे पेय हाडे आणि बुद्धीसाठी फायदेशीर आहे. रात्री किंवा सकाळी नाश्त्याला हे पेय घेणे उन्हाळ्यातही उत्साहवर्धक ठरते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ताक (मठ्ठा)
ताक हे पचनासाठी अमृत मानले जाते. एक ग्लास ताकातून ३ ते ५ ग्रॅम प्रोटीन मिळते. हे लस्सीपेक्षा हलके असल्याने उन्हाळ्यात वारंवार घेता येते. यात जिरे आणि कोथिंबीर घातल्याने थंडावा आणि चव दोन्ही मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सत्तूचे सरबत
भाजलेल्या हरभऱ्याच्या पिठापासून (सत्तू) बनवलेले हे सरबत ‘गरिबांचे प्रोटीन शेक’ मानले जाते. दोन चमचे सत्तूच्या एक ग्लास सरबतामधून ७ ते ९ ग्रॅम प्रोटीन मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
थंडाई
होळी असो वा कडक उन्हाळा, थंडाई हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. दूध, बदाम, पिस्ता आणि टरबूजाच्या बियांच्या मिश्रणामुळे यात ६ ते ९ ग्रॅम प्रोटीन असते. हे पेय शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शेंगदाणा मिल्कशेक
भाजलेले शेंगदाणे आणि दूध यांचे मिश्रण करून बनवलेल्या घरगुती शेकमधून ८ ते १० ग्रॅम प्रोटीन मिळते. हा शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा सर्वात स्वस्त आणि मस्त पर्याय आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सोया दूध
सोयाबीनपासून तयार केलेले दूध ६ ते ८ ग्रॅम प्रोटीन पुरवते. ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात गूळ किंवा वेलची घालून अधिक चविष्ट बनवता येते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शक्यतो घरगुती पेयेच निवडा. बाजारातील पाकिटात मिळणाऱ्या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त आणि प्रोटीन कमी असू शकते. शरीराची १०-१५ ग्रॅम प्रोटीनची गरज अशा पेयांमधून भागवणे शक्य आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
आनंदवार्ता… जळगावहून सकाळी पुणे जाण्यासाठी सोयीची आणखी एक रेल्वे; जाणून घ्या वेळापत्रक