-
अनेक महिला स्वच्छतेसाठी किंवा सुरक्षिततेसाठी दररोज पँटी लाइनर्सचा वापर करतात. मात्र, याचा सततचा वापर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
-
पँटी लाइनर्सच्या सततच्या वापरामुळे नाजूक त्वचेवर घर्षण होते. परिणामी, त्या भागात खाज सुटणे, लालसरपणा येणे किंवा पुरळ (रॅशेस) येण्याचा धोका असतो.
-
बहुतांश पँटी लाइनर्समध्ये प्लास्टिकचा थर असतो. यामुळे संबंधित भागात हवा खेळती राहत नाही, परिणामी उष्णता आणि ओलावा वाढतो.
-
ओलावा आणि उष्णतेमुळे बॅक्टेरिया किंवा बुरशीची (Fungal Infection) वाढ वेगाने होते. यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) आणि इतर संसर्ग होण्याचा धोका बळावतो.
-
पँटी लाइनर्स योनीमार्गातील नैसर्गिक आणि आवश्यक ओलावा शोषून घेतात. यामुळे त्या भागात कोरडेपणा जाणवून अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
-
सुगंधी किंवा केमिकल्सयुक्त लाइनर्समुळे त्वचेला ॲलर्जी होऊ शकते. इतकेच नाही तर शरीराचा नैसर्गिक ‘pH बॅलन्स’ बिघडण्याची शक्यता असते.
-
जर तुम्हाला पँटी लाइनर्स वापरणे अनिवार्य वाटत असेल, तर दर ४ ते ६ तासांनी ते बदला.
-
तसेच, रात्री झोपताना त्यांचा वापर टाळा, जेणेकरून त्वचेला मोकळी हवा मिळेल आणि आरोग्य जपले जाईल.
‘या’ तारखेला जन्मलेली मुलं आईची घेतात खूप काळजी! लग्नानंतरही बायकोपेक्षा आईलाच देतात महत्त्व…