-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने नुकतेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अश्विनीने अत्यंत सात्त्विक आणि मोहक रूप धारण केले आहे.
-
अश्विनीने परिधान केलेली पीच आणि सोनेरी रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
दागिन्यांच्या बाबतीत अश्विनीने पारंपरिकतेला महत्त्व दिले असून, गळ्यातील जड नक्षीदार हार आणि कानातील झुमके तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
-
या फोटोंना तिने श्रीकांत सिंधू मधुकर यांच्या ओळींची कॅप्शन दिली असून, “तू अक्षर ओवाळून टाक तिच्यावर, ती कविता बनेल तुझी” असे भावपूर्ण शब्द तिने वापरले आहेत.
-
“तू ओळख दाखव हक्काने तिची, ती संहिता बनेल तुझी” अशा शब्दांत तिनं आपल्या पोस्टद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.
-
अश्विनीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अवघ्या काही तासांतच या पोस्टवर हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
-
आपल्या अभिनयानं घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही किती साधी आणि सुंदर आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अश्विनी महांगडे /इन्स्टाग्राम)
४० दिवसांनंतर छप्परफाड पैसा! गुरू उदयामुळे ‘या’ ४ राशींवर होणार पैशांचा वर्षाव, सुरू होतील अच्छे दिन…