-
भारतीय स्वयंपाकघरातील डाळ हा प्रथिनांचा (Protein) सर्वांत मोठा आणि विश्वासार्ह स्रोत आहे. लोह, फायबर व ऊर्जेने समृद्ध असलेली डाळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मात्र, ती बनवण्याच्या पद्धतीत होणाऱ्या काही छोट्या चुकांमुळे त्यातील प्रथिनांचे मूल्य कमी होऊ शकते. डाळीतील संपूर्ण पोषण शरीराला मिळावे यासाठी स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याची ही थोडक्यात माहिती: (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
डाळ न भिजवणे
डाळ न भिजवता शिजवल्याने त्यातील फायटेट्समुळे प्रथिनांचे शोषण कमी होते; त्यामुळे डाळ किमान दोन तास आधी भिजत ठेवावी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
गरजेपेक्षा जास्त शिजवणे
डाळ जास्त वेळ किंवा अति शिजवल्याने त्यातील नाजूक अमिनो ॲसिड्स आणि प्रथिनांची रचना खराब होऊ शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
खाण्याचा सोडा वापरणे
डाळ लवकर शिजण्यासाठी त्यात सोडा घातल्याने त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात आणि प्रथिनांच्या नैसर्गिक गुणवत्तेवर परिणाम होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
शिजवलेले पाणी फेकून देणे
डाळ शिजवलेले पाणी फेकून दिल्यास, त्यात विरघळलेली प्रथिने आणि महत्त्वाची पोषक तत्त्वे वाया जातात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
धान्यासोबत न खाणे
डाळ ही भात किंवा पोळीसोबत खाण्याऐवजी स्वतंत्रपणे खाल्ली, तर शरीराला पूर्णपणे प्रथिने (कम्प्लीट प्रोटीन) मिळत नाहीत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वारंवार गरम करणे
एकदा तयार केली गेलेली डाळ पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिनांचे मूल्य हळूहळू कमी होत जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
फोडणी जळणे
पदार्थासाठी प्रथम फोडणी देताना तेल जास्त प्रमाणात गरम केले गेले, तर त्यात फोडणीसाठी वापरले गेलेले पदार्थ जळतात. त्यामुळे डाळीची चव तर बिघडतेच; पण त्यातील पोषक घटकही कमी होतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
४० दिवसांनंतर छप्परफाड पैसा! गुरू उदयामुळे ‘या’ ४ राशींवर होणार पैशांचा वर्षाव, सुरू होतील अच्छे दिन…