-
ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, विद्या आणि बुद्धिचा कारक ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते.
-
तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार, ०२ एप्रिल रोजी ग्रहांचा सेनापती मंगळाने मीन राशीत प्रवेश करणार तो सूर्य आधीपासूनच मीन राशीत विराजमान आहे.
-
मीन राशीत ‘मंगलादित्य राजयोग’ होईल. हा योग १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी असेल.
-
मंगळ-सूर्याच्या युतीमुळे मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल.
-
मंगळ-सूर्याच्या युतीचे धनु राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. -
मेष राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-सूर्याची युती तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. -
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ-सूर्याची युती खूप सकारात्मक फळ देणारी ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
शोभन योगात राम नवमी! ३ राशींचा सुरु होईल शुभ काळ; कोणाला लाभेल सुख-समृद्धी तर कोणाला होईल धनलाभ; बघा तुमची रास आहे का नशीबवान