-
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता भुवन अरोरा आणि त्याची पत्नी वनेजा गुप्ता लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
भुवन अरोरा व पत्नी वनेजा यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
-
भुवनने अरोराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पत्नी वनेजा आपला बेबी बंप दाखवताना दिसत आहे.
-
तसेच भुवनने हातात एक पाटी धरली आहे आणि त्यावर Coming Soon असे लिहिले आहे.
-
“आता ही मुलं स्वतः एका बाळाला जन्म देणार आहेत” असं मजेशीर कॅप्शनही त्याने या फोटोखाली लिहिलं आहे.
-
भुवन व वनेजा यांचे २०२१ च्या अखेरीस या लग्न झाले होते. अशातच आता दोघे आई-बाबा होणार आहेत.
-
भुवन व वनेजा यांनी आई-बाबा होणार असल्याचे सांगताच कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
रोशनी वालिया, सायनी गुप्ता, चिराग गर्ग आणि रेणुका शहाणेंसह अनेकांनी दोघांना ‘अभिनंदन’ म्हटलं आहे.
-
दरम्यान, भुवन ”फर्जी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘तेवर’, ‘चंदू चॅम्पियन’ व ‘अमरन’सारख्या प्रोजेक्टमध्ये झळकला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
“NEET चर्चेस सरकार तयार”, राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री प्रधानांची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर राजकारणाचा आरोप