-
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या तिच्या आगामी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
-
सईने केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
-
सई लवकरच अॅमेझॉन प्राइमच्या ‘मटका किंग’ या बहुप्रतीक्षित सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
सिद्धार्थ रॉय कपूर व नागराज मंजुळे यांनी मिळून या वेब सीरिजची निर्मिती केली असून याचं लेखन व दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
-
या वेब सीरिजच्या प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी सईने विशेष लूक केला होता.
-
प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी सईने बिबट्या (Leopard) प्रिंट असलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज परिधान केला होता.
-
विशेष म्हणजे, हे फोटो शेअर करताना सईने दिलेले कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने फोटोंना “If बिबट्या Was A Person” (जर बिबट्या माणूस असता तर…) असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Zudio मध्ये कपडे इतके स्वस्त कसे? कमी किमतीतही कंपनीला नफा कसा मिळतो; जाणून घ्या बिझनेस स्ट्रॅटेजी