-
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या दोन्ही सुना, श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट नेहमीच चर्चेत असतात. दोघींचं शिक्षण किती झालंय, ते जाणून घेऊयात. (फोटो- फायनान्शिअल एक्सप्रेस)
-
मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचे लग्न २०१९ मध्ये श्लोका मेहताशी झाले. या दांपत्यला पृथ्वी नावाचा मुलगा आणि वेदा नावाची मुलगी आहे.
-
श्लोका मेहताने तिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले आहे. (फोटो- तन्वी मराठे इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर, श्लोका मेहताने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून मानववंशशास्त्र (Anthropology) विषयात पदवी घेतली. (फोटो- तन्वी मराठे इन्स्टाग्राम)
-
पुढे श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिने कायद्यात पदव्युत्तर पदवीचे (Masters in Law) शिक्षण पूर्ण केले. (फोटो- तन्वी मराठे इन्स्टाग्राम)
-
मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचे लग्न २०२४ मध्ये राधिका मर्चंटशी झाले. अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट देखील खूप यशस्वी आहे. (फोटो – राधिका मर्चंट इन्स्टाग्राम)
-
राधिका मर्चंटने मुंबईतील ‘द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल’ आणि ‘इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल’ मधून शालेय शिक्षण घेतले. (फोटो – राधिका मर्चंट इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर राधिकाने मुंबईच्या बीडी सोमानी इंटरनॅशनल स्कूलमधून ‘आयबी डिप्लोमा’ (IB Diploma) केला. (फोटो – राधिका मर्चंट इन्स्टाग्राम)
-
राधिका मर्चंटने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांत ग्रॅज्युएशन पूर्ण केले. (फोटो – राधिका मर्चंट इन्स्टाग्राम)
‘सुरुवातीच्या काळात अशा प्रकारच्या गाजावाजाची गरजच…’, तुकाराम मुंढेंबद्दल BMC आयुक्त अश्विनी भिडे काय म्हणाल्या?