-
ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे.
-
एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील.
-
या काळात शनी नक्षत्र परिवर्तन करेल, वक्री, अस्त, मार्गी देखील होईल. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर नक्कीच पाहायला मिळेल
-
पंचांगानुसार, १३ मार्च २०२६ रोजी शनी अस्त झाला असून तो १७ एप्रिल २०२६ रोजी या स्थितीतून बाहेर येईल २०२६ मध्ये एकूण ३५ दिवसांसाठी शनी अस्त असेल. तसेच २०२७ मध्ये शनी एकूण ३६ दिवसांसाठी अस्त होईल.
-
शनी २६ मार्च २०२७ रोजी अस्त होणार असून ०१ मे २०२७ रोजी या स्थितीतून बाहेर येईल. या काळातही शनी मीन राशीत विराजमान असेल. शनीही स्थिती काही राशींसाठी लाभदायक ठरू शकते.
-
शनीचे अस्त होणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात तुमचे आयुष्य बदलेल. तुमच्यात धैर्य आणि पराक्रम वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा भागीदारीची ऑफर मिळू शकते, जी भविष्यात फायदेशीर ठरेल.
-
शनीची अस्त अवस्था मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय मिळू शकतो. तुमच्या शत्रूंवरही विजय मिळेल. तुमच्या मुलांशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते. -
शनीची अस्त स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक असू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती मिळू शकते. त्याचवेळी, या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या लोकांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांच्या जागेवर पुण्यातील माजी महापौर इच्छुक?