-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
-
तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, चंद्र ३१ मार्च २०२६ रोजी रात्री ०९ वाजून ३१ मिनिटांनी कन्या राशीत गोचर करणार असून चंद्राचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक सिद्ध होईल.
-
चंद्राचा कन्या राशीतील प्रवेश कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
-
कन्या राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन कर्क राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कन्या राशीतील प्रवेश खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा कन्या राशीतील प्रवेश खूप उत्तम असेल. या दिवशी केलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
३० एप्रिलपर्यंत मेष, मिथुनसह ‘या’ राशींचं नशीब सोन्यासम चमकणार! हनुमानाची राहील कृपा; वाचा तुमच्या नशिबात काय