-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो जूनपर्यंत याच राशी राहणार आहे.
-
पंचांगानुसार, गुरू ०२ मे २०२६ रोजी मिथुन राशीतून मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तसेच तो ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल.
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. -
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल