-
डायबिटीज हा असा आजार आहे, ज्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. काहीही खाल्ले तरी साखरेचे प्रमाण वाढू शकते. घरगुती जेवणातही असे काही घटक असतात, जे साखरेचे प्रमाण वाढवू शकतात.
-
पण तुम्हाला माहिती आहे का की, असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही शिळे झाल्यानंतर खाल्ले तर ते साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
-
यावर आहारतज्ज्ञ शीनम कालरा मल्होत्रा यांनी सांगितले की, जर तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करायचे असेल तर तुम्ही काही शिळे पदार्थ खाण्यास सुरुवात करू शकता. दैनंदिन आहारात काही छोटे बदल करणे फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊया पदार्थांविषयी…
-
डायबिटीज असल्यास शिळा भात खाणे फायदेशीर ठरू शकते असे आहारतज्ज्ञ शीनम कालरा मल्होत्रा यांचे म्हणणे आहे. रात्री बनवलेला भात फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही सकाळी खाऊ शकता. यामुळे भातात रेजिस्टेंट स्टार्च वाढतो, त्यामुळे इन्सुलिन रिस्पॉन्स सुधारतो.
-
सोप्या भाषेत सांगायचे तर शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखली जाते आणि पचन क्रिया सुधारते; आतड्यांच्या आरोग्यासाठीही हे फायदेशीर असते.
-
आहारतज्ज्ञ शीनम कालरा मल्होत्रा यांच्या मते, शिळी भाकरी खाणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर असते. सकाळी बनवलेली भाकरी रात्री खा, यामुळे भाकरीतील ग्लायसेमिक प्रभाव कमी होतो आणि साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
-
तुम्ही वाटल्यास ती गरम करूनदेखील खाऊ शकता. याशिवाय अशा भाकरीमुळे पोट जास्त काळ भरल्यासारखे वाटते.
-
आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला डायबिटीज असेल तरीही तुम्ही बटाटे खाऊ शकता, परंतु खाण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. बटाटे उकळून ५ ते ६ तास फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर खा, यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि साखरेचे प्रमाण कमी होते.
-
तुम्ही चणे, राजमा बनवत असाल तर ते उकळल्यानंतर ५ ते ६ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवा
-
त्यानंतर तुमची भाजी किंवा सॅलेड तयार करा, यामुळे जेवणानंतर साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता कमी होते आणि ते पचण्यासही सोपे जाते.
-
जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल आणि तुम्ही ओट्स किंवा डाळ खात असाल तर ती खाण्याची पद्धत थोडी बदला.
-
डाळ किंवा ओट्स रात्रभर भिजत ठेवा, यामुळे त्याच्यातील रेजिस्टेंस स्टार्च वाढते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होते.
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प