-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. तर शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते.
-
या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
-
पंचांगानुसार, शुक्र सध्या मेष राशीत विराजमान असून या राशीत तो १९ एप्रिल २०२६ रोजी तो वृषभ राशीत प्रवेश करेल. याच राशीत १७ एप्रिल रोजी चंद्रदेखील गोचर करेल. मंगळाच्या मेष राशीत शुक्र-चंद्र एकत्र येताच ‘कलात्मक योग’ निर्माण होईल, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर होईल.
-
हा योग कर्क राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी कलात्मक योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल.
-
कलात्मक योग वृषभ राशीच्या लोकांचा भरपूर आत्मविश्वास वाढेल. या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प