-
ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते.
-
तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. राहू ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो.
-
पंचांगानुसार, राहू ३१ मे २०२६ रोजी शततारका नक्षत्राच्या प्रथम पदामध्ये गोचर करेल. राहूचे हे नक्षत्र गोचर १२ पैकी काही राशींसाठी नक्कीच लाभदायी ठरणार आहे.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी राहूचे परिवर्तन अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी राहूच्या परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.
-
राहूच्या गोचराने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
नितीन गडकरींनी थेट मुकेश अंबानींना एका उद्योगासाठी विनंती केली, मात्र, आता अंबानींचा मुलगा उघडणार ४०० प्रकल्प