-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
-
अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो. सध्या मंगळ कन्या राशीत विराजमान असून उत्तराफाल्गुनी नक्षत्रामध्ये विराजमान आहे.
-
पंचांगानुसार, मंगळ ०६ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजून ०४ मिनिटांनी उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. उत्तर भाद्रपद नक्षत्राचा स्वामी शनीदेव असून या नक्षत्रामध्ये मंगळ २४ एप्रिलपर्यंत विराजमान असेल. तोपर्यंतचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मंगळाचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
-
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
-
मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे गोचर लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. आनंदी वार्ता कानी पडतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष