-
चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे त्रस्त आहात का?
पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये चेहऱ्यावर केस वाढणे ही एक सामान्य समस्या असून, वैद्यकीय उपचारांसोबतच काही घरगुती नैसर्गिक उपायांनी हे केस हळुवारपणे काढता येतात. -
बेसन आणि दही
चेहऱ्यावरील अनावश्यक केस हळुवारपणे काढण्यासाठी बेसन आणि दह्याचा लेप उत्तम मानला जातो. दोन मोठे चमचे बेसन, दही आणि चिमूटभर हळद पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर चोळून नंतर स्वच्छ धुवावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
हळद आणि दूध
आयुर्वेदानुसार हळद आणि दुधाचे मिश्रण केसांची वाढ कमी करण्यास मदत करते. हळदीमध्ये दाहशामक गुणधर्म असतात. एक मोठा चमचा हळद आणि दूध एकत्र करून, त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास चांगला परिणाम दिसून येतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
साखर आणि लिंबू
घरगुती मेण (वॅक्स) तयार करण्यासाठी साखर गरम करून, त्यात लिंबाचा रस मिसळावा. हे चिकट मिश्रण चेहऱ्याला लावून, कापडाच्या साह्याने केसांच्या वाढीच्या दिशेने ओढावे. त्यामुळे केस मुळापासून निघण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
ओटमिल आणि केळी
ओटमिल आणि कुस्करलेली केळी यांचा स्क्रब तयार करून, तो १० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा. या मिश्रणाचा खरखरीतपणा बारीक केस आणि मृत त्वचा काढून टाकण्यास अत्यंत प्रभावी ठरतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पपई आणि हळद
कच्च्या पपईचा गर आणि हळद हे पदार्थ नैसर्गिक उपचारासाठी उपयुक्त मानले जातात. कच्च्या पपईतील घटकांमुळे केसांची वाढ रोखली जाते. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि १० मिनिटांनी धुऊन टाका. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
अंड्याचा पांढरा भाग
अंड्याचा पांढरा भाग, मक्याचे पीठ व साखर एकत्र करून, पातळ थर चेहऱ्यावर लावावा. हे मिश्रण सुकल्यानंतर हळूच ओढून काढावे. त्यामुळे चेहऱ्यावरील बारीक केस सहज निघून येतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पुदिन्याचा चहा
पीसीओएसमुळे वाढणारे केस कमी करण्यासाठी पुदिन्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. दिवसातून दोन वेळा या चहाचे सेवन केल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि केसांची अतिवृद्धी थांबते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Mojtaba Khamenei is in a severe medical condition : अलिप्त, शांत अन् आता असमर्थ; इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी कुठे आहेत? इराणमध्ये सत्तासंकट? धक्कादायक वृत्त समोर