-
पोळ्या कडक होण्याचे मुख्य कारण काय?
पोळ्यांमधील ओलावा (Moisture) हवेत उडून जाणे आणि पिठातील स्टार्च कडक होणे यांमुळे पोळ्या कडक होतात. -
पीठ मळताना काय काळजी घ्यावी?
पीठ खूप घट्ट मळू नये. ते थोडे सैलसर, लवचिक आणि हाताला किंचितसे चिकट लागेल, अशा रीतीने मळावे. -
पिठात तेल किंवा तूप घालण्याचे काय फायदे आहेत?
पिठात थोडे तेल किंवा तूप घातल्याने पिठातील ओलावा टिकून राहतो आणि पोळीला छान मऊ पोत (Texture) येतो. -
पीठ मळल्यानंतर किती वेळ ठेवावे?
पीठ मळल्यानंतर किमान २० ते ३० मिनिटे झाकून ठेवावे, ज्यामुळे ग्लुटेन सेट होऊन पोळ्या मऊ होतात. -
पोळी भाजण्यासाठी तवा कसा असावा?
तवा चांगला गरम असावा. तवा थंड असल्यास पोळी जास्त वेळ तव्यावर राहते आणि कडक होते. -
पोळी लवकर का भाजून घ्यावी?
पोळी जितक्या कमी वेळात भाजली जाईल, तितका तिचा अंतर्गत ओलावा जास्त टिकतो आणि ती मऊ राहते. (फोटो सौजन्य : पेक्सेल्स) -
पोळ्या डब्यात कशा ठेवाव्यात?
तयार पोळ्या लगेच एका स्वच्छ सुती कापडात गुंडाळून डब्यात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांची वाफ आतच राहील. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश) -
दूध किंवा दही वापरल्याने काय होते?
पीठ मळताना कोमट दूध किंवा एक चमचा दही घातल्याने पोळ्या अधिक काळ कापसासारख्या मऊ राहतात. -
डब्यात पोळी ओलसर होऊ नये म्हणून काय करावे?
स्टीलच्या डब्यात खाली सुती कापड अंथरून त्यावर पोळ्या ठेवाव्यात, जेणेकरून वाफेचे पाणी कापड शोषून घेईल. (सर्व फोटो सौजन्य: फ्रीपिक)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?