-
अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा, १९ एप्रिल २०२६ रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल. या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय करता येते.
-
हिंदू पंचागांनुसार, अक्षय्य तृतीयेचा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो.
-
या वर्षी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ योग निर्माण होत आहेत. तसेच हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातूनही खूप खास मानला जातो. या दिवशी चंद्राचे गोचर होणार आहे. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींवर नक्कीच पाहायला मिळेल.
-
पंचांगानुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी चंद्र मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी शुक्राच्या वृषभ राशीत गोचर करणार असून चंद्राचे हे गोचर काही राशींसाठी भाग्यदायी ठरू शकते.
-
अक्षय्य तृतीयेचा दिवस कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.
-
सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. -
अक्षय्य तृतीयेचा दिवस वृषभ राशींच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घेऊन येईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस लाभदायी ठरेल. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीची योजना आखू शकता. नोकरी करणाऱ्यांना मोठे आर्थिक फायदे मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?