-
सकाळी कंटाळा करत उठायचं, उठल्यावर मोबाईल हातात घ्यायचा आणि रील स्क्रोल करत बसायचं अशा अनेक वाईट सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या मूलभूत गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण, सकाळी तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचा नकळतपणे तुमच्या शरीरावर आणि संपूर्ण दिवसावर परिणाम होत असतो. पोषण तज्ज्ञ दीपशिखा जैन यांच्या मते, झोपेतून उठल्यानंतरचे पहिले दोन तास आपल्या ऊर्जेची पातळी, एकाग्रता, अगदी आपल्या चयापचय क्रियेवरही (metabolism) परिणाम करण्याची क्षमता बाळगतात. त्यामुळे ‘योग्य वेळी योग्य गोष्टी’ करण्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सातत्य महत्त्वाचं – पहिली पायरी साधी, सोपी आहे; पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ती म्हणजे दररोज एकाच वेळी झोपेतून उठणं. सकाळी उठण्याची वेळ नियमित ठेवल्यास तुम्हाला इंटर्नल क्लॉक (Internal Clock) नियंत्रित करण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या शरीरात सुस्ती (आळस) राहत नाही आणि ऊर्जेची पातळी सातत्यानं टिकवून ठेवता येते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सगळ्यात आधी पाणी प्या – झोपेतून उठल्यानंतरच्या पहिल्या काही मिनिटांतच लगेच पाणी प्यायल्यानं, तुमच्या शरीराची कार्यप्रणाली पुन्हा जोमानं सुरू होण्यास मदत मिळते. ही सवय शरीराला जागं करण्याबरोबर तुमच्या पचनसंस्थेसाठीही अत्यंत गुणकारी ठरते. अनेक तास झोपल्यानंतर शरीराचे कामकाज पुन्हा सुरळीतपणे चालण्यासाठी त्याला पाण्याची नितांत गरज असते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सूर्यप्रकाश – नैसर्गिक सूर्यप्रकाशात काही मिनिटं बसल्यानं लक्षणीय फरक पडू शकतो. सकाळचा सूर्यप्रकाश आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन योग्य प्रमाणात तयार होण्याच्या दृष्टीनं मदत करतो. हे हार्मोन आपल्याला जागं, ताजंतवानं आणि ऊर्जावान वाटण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याव्यतिरिक्त, सकाळचा सूर्यप्रकाश ‘सर्केडियन ऱ्हिदम’ (शरीराचे नैसर्गिक जैविक चक्र) नियंत्रित करण्यास मदत करतो, ज्यामुळे चांगली झोप लागते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कॉफी पिण्याची योग्य वेळ – झोपेतून उठल्याबरोबर लगेचच कॉफी पिण्याऐवजी थोड्या वेळानं प्या. नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर कॉफी प्यायल्यास, हार्मोन्सच्या नैसर्गिक लयीत कोणताही व्यत्यय न येत४ता, तुम्हाला अधिक सावध आणि टवटवीत वाटण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
व्यायाम करा – सकाळी शारीरिक व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा राहण्यास मदत होते. त्याशिवाय यामुळे तुमचा मूड, एकाग्रता यांत सुधारणा होते, ज्यामुळे तुमचा दिवस अधिक चांगला जातो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
स्वतःला शांत करा – श्वासोच्छ्वास आणि ध्यान या दोन्ही गोष्टींनी दिवसाची सुरुवात करा. त्यामुळे मज्जासंस्था शांत राहण्यास , तणाव कमी करण्यास आणि तुमचे मन खंबीर करण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
नाश्ता चुकवू नका – सकाळी तुम्ही जे अन्न खाता, त्यानुसार तुमचा मूड ठरत असतो. प्रथिने, तंतुमयतेचा समावेश असलेला नाश्ता रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे तुम्हाला अचानक थकवा न येता, जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि ऊर्जासुद्धा मिळते.(फोटो सौजन्य: Freepik)
-
तर दिवसभर फ्रेश राहण्यासाठी तुम्हाला सोप्या गोष्टींपासून सुरुवात करायची आहे. तुमच्या दिवसाच्या पहिल्या दोन तासांतील लहान, जाणीवपूर्वक केलेल्या सवयी पुढील काही तासांसाठी उपयोगी ठरू शकतात. कारण- कधी कधी जास्त गोष्टी करण्याने नाही, तर योग्य क्रमाने गोष्टी करण्याने ऊर्जा मिळविता येते. (फोटो सौजन्य: Freepik)
डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली? अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीत नेमके काय?