-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो.
-
चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. ज्यामुळे अनेकदा तो एका महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करतो.
-
शिवाय नक्षत्र परिवर्तन, नक्षत्र पद परिवर्तनही करतो. सध्या बुध कुंभ राशीत विराजमान असून तो लवकरच देवगुरूच्या मीन राशीत जाईल.
-
पंचांगानुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २० मिनिटांनी बुध देवगुरूच्या मी राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत बुध ३० एप्रिल २०२६ पर्यंत राहील. बुधाचे हे गोचर १२ पैकी राशींच्या लोकांसाठी खूपच लाभदायी सिद्ध होईल.
-
बुधाचे गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. या काळात जमीन खरेदी करू शकता.
-
बुधाचे गोचर वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील.
-
कन्या राशीसाठी बुधाचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण