-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. गुरु सध्या मिथुन राशीत विराजमान असून तो जूनपर्यंत याच राशी राहणार आहे. -
पंचांगानुसार, गुरू ०२ जून २०२६ रोजी मिथुन राशीतून मध्यरात्री ०२ वाजून २५ मिनिटांनी आपली उच्च राशी असलेल्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे.
-
या राशीत तो ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत विराजमान असेल. गुरूचे हे राशी परिवर्तन नक्कीच १२ पैकी काही राशींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल.
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल;
-
गुरू ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कर्क राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.
-
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
सावंतवाडी अन् दोडामार्ग तालुक्यात ‘किंग कोब्रा’चे दर्शन; निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण