-
वाढत्या उन्हाळ्यात विजेचे बिल आवाक्याबाहेर जात असताना काही सोप्या स्मार्ट टिप्स वापरून आपण घरबसल्या मोठी आर्थिक बचत करू शकता. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
वातानुकूलित यंत्र लावण्यापूर्वी छताचा पंखा सुरू करावा, ज्यामुळे खोलीतील गरम हवा लवकर बाहेर पडून गारवा निर्माण होईल. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
वातानुकूलित यंत्राचे तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसवर स्थिर ठेवावे, जेणेकरून विजेचा वापर मर्यादित राहील आणि थंडावाही मिळेल. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
नवीन उपकरणे घेताना पाच तारांकित मानांकन असलेलेच घ्यावे, कारण ही आधुनिक यंत्रे सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वीज वाचवू शकतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
पंख्याच्या पात्यांची वेळोवेळी स्वच्छता करावी, कारण धूलिकणांमुळे वेग कमी होऊन हवा खेळती राहण्यास अडथळा निर्माण होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
शीतकपाटाचा दरवाजा कारणाशिवाय वारंवार उघडू नये, जेणेकरून आतील थंडावा कायम राहून वीज वापर कमी होण्यास मदत होईल. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
दूरचित्रवाणी किंवा भ्रमणध्वनी प्रभारक वापरात नसताना केवळ बटण बंद न करता मुख्य जोडणी काढून ठेवावी. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
खिडक्यांना गडद रंगाचे पडदे लावल्यास दुपारची उष्णता रोखली जाते आणि घर थंड ठेवण्यासाठी जास्त वीज खर्च होत नाही. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
Photos: “मला तुझी मुलगी असल्याचा खूप अभिमान…”; अमृता फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुलगी दिविजा फडणवीसची भावूक पोस्ट