-
ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.
-
शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तन आणि नक्षत्र पद परिवर्तनही करतो.
-
पंचांगानुसार, शनी १७ एप्रिल २०२६ रोजी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या चतुर्थ पदामध्ये दुपारी ०४ वाजून ०५ मिनिटांनी प्रवेश करणार आहे. शनीचे हे नक्षत्र पद परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी नुकसानदायी ठरू शकते.
-
शनीचे नक्षत्र पद गोचर कुंभ राशीसाठी खूपच लाभदायी ठरेल. या काळात कोर्ट-कचेरीच्या कामांत पराभव होऊ शकतो आणि काही गुप्त शत्रू त्रास देऊ शकतात. -
कन्या राशीच्या विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव येऊ शकतो. या काळात भागीदारीत नवीन काम सुरू करण्याचे टाळा. तसेच कुटुंबातील लोकांसोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात.
-
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे गोचर नुकसानदायक ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या पहिल्या भावात होईल. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. -
धनु राशीच्या लोकांना शनीचे नक्षत्र गोचर घातक ठरू शकते. नवीन गुंतवणूक, कर्ज घेणे किंवा मोठ्या खर्चाचे नियोजन करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते. तसेच आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
Devendra Fadnavis : “शरद पवारांचा तो लेख अत्यंत चुकीचा”, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य; वारकरी संप्रदायावरून राजकीय वाद पेटला?