-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
तर चंद्र ग्रहाला माता, मन, भावना, सौम्यता आणि सुंदरतेचा कारक ग्रह म्हणून पाहिले जाते. नवग्रहांपैकी चंद्र आणि शुक्र हे दोन असे ग्रह आहे ज्यांना आकर्षण आणि सुंदरचा ग्रह म्हटले जाते. -
हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा कलात्मक राजयोग निर्माण करतात. हा योग व्यक्तीला कल्पनाशील आणि रचनात्मक बनवतो. कुंडलीत हा योग असणं अत्यंत भाग्यशाली मानले जाते.
-
पंचांगानुसार, शुक्र सध्या मेष राशीत विराजमान असून १७ मार्च २०२६ रोजी रात्री चंद्रदेव देखील याच राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे हा शुभ ‘कलात्मक योग’ निर्माण होईल. हा योग ४८ तासांसाठी मेष राशीत निर्माण होईल.
-
मेष राशीच्या लोकांसाठी हा योग खूप खास असणार आहे. कारण, मेष राशीतच हा योग निर्माण होणार आहे. तुमच्या उत्पन्नवाढ, गुंतवणुकीतून लाभ किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात आकर्षकता वाढेल. सामाजिक वर्तुळात मान-सन्मान वाढू शकतो.
-
वृषभ या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास वाढेल. सौंदर्य, आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल.
-
चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. त्यामुळे चंद्र-शुक्र युती कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक समाधानासोबत आर्थिक संधी देऊ शकते. प्रवास, शिक्षण किंवा सर्जनशील प्रकल्पांतून लाभ संभवतो. या काळात भौतिक सुखात प्रचंड वाढ होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”