-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
-
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.
-
इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.
-
पंचागानुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३८ मिनिटांनी रेवती नक्षत्रातून अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात सूर्य २८ एप्रिलपर्यंत राहील. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीचे लोक अनुभवतील.
-
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचा अश्विनी नक्षत्रातील प्रवेश अत्यंत शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल.
-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल.
-
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल. हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
“माझ्या बायकोची जात वेगळी आहे”, घरी गणपती बसवल्याने झालेला वाद, भाऊ कदम म्हणाले, “आमचे बौद्ध बांधव…”