-
Shani Sade Sati effects : न्यायदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनीचा प्रभाव जेव्हा एखाद्या राशीवर साडेसातीच्या स्वरूपात येतो, तेव्हा त्या काळाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व दिले जाते.
-
साधारण साडेसात वर्षे चालणाऱ्या या कालावधीत शनीची दृष्टी कठोर मानली जाते. या काळात व्यक्तीच्या आयुष्यात अनेक बदल, आव्हाने आणि काही वेळा महत्त्वाच्या संधीही निर्माण होऊ शकतात.
-
सध्या मीन, कुंभ आणि मेष या तीन राशींवर शनीची साडेसाती सुरू असून, या राशींवर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तिचा प्रभाव दिसत आहे.
-
तीन राशींवर सुरु आहे साडेसाती
सध्या शनी मीन राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत असल्याचे मानले जाते. ज्योतिष गणनेनुसार ३ जून २०२७ पर्यंत शनी मीन राशीत राहतील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील. या संक्रमणामुळे पुढील काही वर्षांत विविध राशींवरील साडेसातीचे टप्पे बदलत जाणार आहेत.तीन राशींवर सुरु आहे साडेसाती
सध्या शनी मीन राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा सर्वाधिक प्रभाव जाणवत असल्याचे मानले जाते. ज्योतिष गणनेनुसार ३ जून २०२७ पर्यंत शनी मीन राशीत राहतील आणि त्यानंतर मेष राशीत प्रवेश करतील. या संक्रमणामुळे पुढील काही वर्षांत विविध राशींवरील साडेसातीचे टप्पे बदलत जाणार आहेत. -
नोकरीत बदली होणे, व्यवसायात अनपेक्षित नुकसान होणे किंवा खर्च अचानक वाढणे अशा घडामोडी घडू शकतात. काही व्यक्तींना डोळ्यांशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो, तर कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासू शकते. हा पहिला टप्पा जून २०२७ पर्यंत चालेल, असे मानले जाते.
-
कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असल्याने संयम राखणे आवश्यक ठरते. या टप्प्यानंतर जून २०२७ मध्ये मीन राशीसाठी तिसरा टप्पा सुरू होईल आणि २०३२ मध्ये या राशीला साडेसातीपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल, असे सांगितले जाते. या काळात प्रामाणिकपणे वागणे आणि कोणत्याही अनैतिक मार्गापासून दूर राहणे महत्त्वाचे मानले जाते.
-
ज्योतिषशास्त्रानुसार साडेसाती हा केवळ अडचणींचाच काळ नसून आत्मपरीक्षण, शिस्त आणि संयम शिकवणारा काळ मानला जातो. त्यामुळे या काळात धीर, मेहनत आणि नियोजन यांना विशेष महत्त्व दिल्यास दीर्घकालीन लाभ मिळू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. (सर्व फोटो सौजन्य – AI निर्मित -चॅटजीपीटी- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)


