-
महाराष्ट्रात एप्रिल २०२६ च्या मध्यावर उन्हाचा तडाखा वाढला असून विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे.
-
तहान लागण्याची वाट न पाहता दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
-
आहारात नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक, कोकम सरबत आणि कैरीच्या पन्ह्याचा समावेश करा.
-
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी कलिंगड, संत्री आणि द्राक्षे यांसारखी हंगामी फळे खा.
-
नेहमी ताजे आणि घरी शिजवलेले अन्न खा. उन्हाळ्यात शिळे अन्न लवकर खराब होऊन विषबाधा होण्याची शक्यता असते.
-
जास्त तिखट, तेलकट आणि जंक फूड टाळा, कारण यामुळे शरीरातील उष्णता वाढते.
-
उन्हाळ्यात घाम शोषून घेणारे, सैल आणि फिकट रंगाचे सुती कपडे वापरा.
-
दुपारी बाहेर पडताना छत्री, टोपी किंवा स्कार्फचा वापर करा. तसेच, डोळ्यांच्या संरक्षणासाठी चांगल्या दर्जाचे सनग्लासेस वापरा.
मोरासमोर फणा पसरुन उभा राहिला भलामोठा किंग कोब्रा, दोन शत्रुंमध्ये पुढे काय घडलं? पाहा धडकी भरवणारा VIDEO