-
कधी – कधी पहाटे तीन वाजता अचानक आपल्याला जाग येते. पण, असे का होते? याचा कधी विचार केलाय का? (फोटो – AI Generated Image)
-
यूके-स्थित एनएचएस जनरल प्रॅक्टिशनर डॉ. अमीर खान यांनी ‘नो अपॉइंटमेंट नीडेड’ पॉडकास्टच्या भागात याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (फोटो – AI Generated Image)
-
डॉ. खान यांनी पहाटे ३ वाजता वारंवार जाग येण्यामागे कॉर्टिसोलची भूमिका स्पष्ट करत जीवनशैलीतील सवयी यांचा उल्लेख केला. (फोटो – AI Generated Image)
-
पहाटे ३ वाजता जाग येणे सामान्य असल्याचे स्पष्ट करताना डॉ. खान यांनी दिवस आणि रात्र कार्यरत असलेल्या कॉर्टिसोलमुळे असे घडत असल्याचे सांगितले. (फोटो – AI Generated Image)
-
सकाळी कॉर्टिसोल नैसर्गिकरित्या वाढतो, ज्यामुळे व्यक्ती अधिक सतर्क असते, आणि रात्री तो कमी होतो, त्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो. (फोटो – AI Generated Image)
-
डॉक्टरांनी या बदलाचे भरती-ओहोटी असे वर्णन करत हे चक्र नैसर्गिक असल्याचे सांगितले. यात कोणताही व्यत्यय आल्यास हे चक्र विस्कळीत होते, आणि परिणामी झोपेची गुणवत्ता बिघडते, असे डॉक्टरांनी सांगितले. (फोटो – AI Generated Image)
-
सतत तणावामुळे झोप लागण्यासाठी आवश्यक असलेली कॉर्टिसोलची पातळी कमी होत नाही, त्यामुळे झोप लागत नाही. पहाटे ३-४ च्या सुमारास ही पातळी वाढायला लागते आणि नंतर थोड्या वेळाने तुम्हाला जाग येऊ लागते. (फोटो – AI Generated Image)
-
म्हणजेच रात्री नैसर्गिकरित्या कॉर्टिसोलची पातळी कमी होण्याऐवजी ती वाढलेलीच राहते त्यावेळी तुम्ही सतर्क अवस्थेत जाता त्यामुळे झोपेची गुणवत्ताही बिघडते. (फोटो – AI Generated Image)
-
थोडक्यात वाढलेला ताण पहाटेच्या सुमारास कॉर्टिसोलची पातळी आणखी वाढवतो आणि ही अचानक झालेली वाढ तुम्हाला पहाटे ३ वाजता खडबडून जागं करते, असे डॉ. खान यांनी सांगितले. (फोटो – AI Generated Image)
‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; उद्धव ठाकरेंसह बॉलिवूडच्या दिग्गजांची मांदियाळी!