-
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला आहे. यंदाच्या पर्वात विजयी ठरली आहे तन्वी कोलते. तर, शोचा उपविजेता ठरला आहे राकेश बापट.
-
तन्वीने पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी’चं घर गाजवलं. पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर तिची शाळा घेण्यात आली होती. मात्र, त्या क्षणापासून तन्वीने तिचा संपूर्ण गेम बदलला.
-
तन्वी ‘बिग बॉस मराठी ६’मध्ये तब्बल दोन वेळा कॅप्टन झाली. याशिवाय ‘तिकीट टू फिनाले’ सुद्धा तिनेच जिंकलं होतं.
-
“मी घरात आले होते तेव्हा तन्वी कोलते होते पण, आता शो संपताना तन्वी कोलते हा ब्रँड झालाय. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठीच मला बिग बॉसच्या घरात यायचं होतं.” अशा भावना ट्रॉफी जिंकल्यावर तन्वीने व्यक्त केल्या. यासह ‘बिग बॉस मराठी’च्या संपूर्ण टीमचे आणि चाहत्यांचे आभार मानले.
-
तन्वी कोलते ही मूळची कोकणातली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घ्यायची हे तिचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं.
-
तन्वी आजवर विविध सौंदर्य स्पर्धांमध्येही (Beauty Pageant) सहभागी झाली होती. मात्र, ‘लक्ष्मी निवास’मुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली.
-
‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत तन्वीने सिंचना ही भूमिका साकारली होती.
-
मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेण्याआधी तन्वी कोलतेने मालिकेतून एक्झिट घेतली होती.
-
आता शो संपल्यावर तन्वीला ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची विजेती ही नवीन ओळख मिळाली आहे. संपूर्ण मनोरंजन विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : तन्वी कोलते इन्स्टाग्राम, कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठी )
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ