-
‘बिग बॉस मराठी सीझन ६’ची चर्चेत राहिलेली स्पर्धक रेवा कौरसे हिने नुकतेच सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले.
-
यावेळी रेवा अत्यंत सुंदर अशा जांभळ्या रंगाच्या (Magenta/Purple) काठपदराच्या साडीत दिसून आली.
-
तिने या पारंपरिक लूकला पूर्ण करण्यासाठी नाकात नथ आणि कपाळावर टिळा लावून मराठमोळा साज केला होता.
-
रेवा या पर्वात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि तिने आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली.
-
अंतिम फेरीच्या अगदी जवळ पोहोचलेली रेवा ‘टॉप ६’मध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली होती.
-
ग्रँड फिनालेच्या शर्यतीत असताना सहाव्या स्थानावरून रेवाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
-
मंदिरातील फोटो शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी माझा Bigg Boss Marathi Season 6 चा प्रवास ज्या ठिकाणाहून सुरू केला… त्या माझ्या लाडक्या बाप्पाच्या चरणी आज पुन्हा येऊन तोच प्रवास पूर्ण करत आहे. हा प्रवास माझ्यासाठी फक्त एक शो नव्हता, तर स्वतःला ओळखण्याचा, मजबूत बनण्याचा आणि प्रत्येक क्षणी नव्यानं उभं राहण्याचा अनुभव होता. या संपूर्ण प्रवासात बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच मी Top 6 पर्यंत पोहोचू शकले. तुमचं प्रत्येक vote, प्रत्येक message, प्रत्येक prayer आणि प्रत्येक support माझ्यासाठी खूप मोठी ताकद होती. तुमच्या विश्वासामुळेच मी प्रत्येक आव्हानाला सामोरी जाऊ शकले. मनापासून धन्यवाद माझ्या सगळ्या प्रेक्षकांना, माझ्या family सारख्या audience ला… तुमचं प्रेम आयुष्यभर माझ्यासोबत राहील.”
-
पुढे तिने कृतज्ञता व्यक्त करत लिहिले, “बाप्पा, असंच माझ्यावर तुझं आशीर्वादाचं छत्र कायम राहू दे आणि पुढच्या प्रत्येक नव्या प्रवासात मला अजून मेहनत करण्याची ताकद दे. हा प्रवास इथे संपला असला तरी माझी स्वप्नं आणि मेहनतीचा प्रवास आता आणखी मोठ्या उंचीवर जाणार आहे.”
-
(सर्व फोटो साभार- रेवा कौरसे इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत